नाशिकमध्ये भाजप आमदाराच्या भावाला लाच घेताना अटक - anti corruption bureau arrests brother of BJP MLA for accepting bribe in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमध्ये भाजप आमदाराच्या भावाला लाच घेताना अटक

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

रंगपंचमीच्या दिवशी केली कारवाई...

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी पकडले.

संजय पटेल असे संशयित लिपिकाचे नाव असून ताे घरपट्टी-नळपट्टी विभागात कार्यरत आहे. नळजाेडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला हाेता. मात्र पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल याने १० हजारांची लाच घेतली. मात्र, सापळा रचलेल्या पथकाने पटेल याला रंगेहाथ पकडले.

संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारदाराने सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी (ता.२) सापळा रचला. पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली. विशेष म्हणजे, संजय पटेल हे आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.

ही पण बातमी वाचा : राज्यात लाॅकडाऊनचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करत ही आहोत. परंतू आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.  आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वंयशिस्तीने सर्वांनी  एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढू या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधातांशी चर्चा करून इतर पर्यायांची  माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशारा ही त्यांनी दिला. आज त्यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख