Nashik AAP Cleaning Drive | Sarkarnama

स्मार्ट सिटीतील रस्ते स्वच्छतेसाठी 'आप' ने केले 'झाडू मारो अभियान' 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

निद्रिस्त मनपा प्रशासन आणि मुजोर नगरसेवक यांना जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी नाशिक कडून संपूर्ण नाशिक महानगरात 'झाडू मारो अभियान' आज सुरु करण्यात आले. नाशिक मधील सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यांची सफाई यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केली.

नाशिक : नाशिक महानगरपालिका, सत्ताधारी भाजपा नाशिक 'स्मार्ट सिटी'चा दावा करते. परंतु शहरातील प्रमुख रस्ते धूळ, चिखल आणि कच यामुळे अतिशय अस्वच्छ आणि असुरक्षित बनले आहेत. त्याने वारंवार अपघात होतात. महिला, ज्येष्ठांना हे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीने शहरात रस्ते स्वच्छतेसाठी 'झाडू मारो' अभियान राबविले आहे. सर्व कार्यकर्ते झाडुसह जाऊन रस्ते झाडत असल्याने नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे. 

याविषयी जनजागृती करावी तसेच निद्रिस्त मनपा प्रशासन आणि मुजोर नगरसेवक यांना जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी नाशिक कडून संपूर्ण नाशिक महानगरात 'झाडू मारो अभियान' आज सुरु करण्यात आले. नाशिक मधील सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यांची सफाई यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. 'आप'चे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी 'स्मार्ट सिटीचे राहू द्या आधी रस्ते स्वच्छ आणि सुरक्षित रस्ते होतील हे पाहिले पाहिजे. सत्ताधारी भाजप त्याबाबत उदासीन आहे,' अशी टीका केली. 

या आंदोलनात जगबीर सिंग, नितीन शुक्‍ल, विकास पाटील, विलास देसले, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, शुभम पडवळ, भूषण ताटिया, संतोष राऊत, सचिन पवार, चंद्रशेखर महानुभाव, अक्षय अहिरे, अभिजित गोसावी आणि स्वप्नील घिया आदी पदाधिकारी सहभागी झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख