narmada dam, narendra modi gujarat news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जनतेच्या स्वप्नासाठी जगणे हेच माझे ध्येय : मोदी 

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

अहमदाबाद : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बांधकामात अनेक अडथळे आले. जागतिक बॅंकेने कर्ज दिले नाही, पण गुजरातची मंदिरे त्यासाठी पुढे आली.अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्ण झालेल्या या धरणामुळे केवळ गुजरातचाच नव्हे तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांचाही विकास होईल असे स्पष्ट करतानाच जनतेच्या स्वप्नांसाठी जगणे हेच माझे ध्येय आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. 

बहुप्रतीक्षित सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी यांच्या वाढदिवसाच्याच दिवसाचा मुहूर्त साधून हा कार्यक्रम करण्यात आला. मोदी म्हणाले,"" आजच्या घडीला सरदार वल्लभभाई पटेल यांचा आत्मा आपल्या देशाला आशीर्वाद देत असेल यात शंका नाही. ते थोडे जास्त काळ जगले असते तर त्याच वेळी हे धरण तयार झाले असते. मातेसमान असलेल्या नर्मदा नदीला आणि त्यावर तयार होणाऱ्या सरदार सरोवर धरणाला आजवर अनंत अडचणींचा सामना करावा लागला. जगातून या धरणाला विरोध झाला. वर्ल्ड बॅंकेने या धरणाला निधी देण्यास नकार दिला. असे असले तरीही आम्ही हे धरण पूर्ण करण्याचा निश्‍चय केला होता, जो आज पूर्णत्त्वास आला. या प्रकल्पासाठी जेव्हा बॅंकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मंदिरांनी पैसे उभे केले. ही बाब अभिमानाची आहे.'' 

सरदार सरोवर प्रकल्पामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणार आहे. या प्रकल्पामुळे जनतेला जे पाणी मिळणार आहे त्यामुळे कोट्यवधी मातांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी असणार आहेत. मुक्‍या जनावरांना पाणी मिळणार आहे त्यांचेही आशीर्वाद मिळणार आहेत असेही मोदी यावेळी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख