मी मेल्यावर हाडे उकरली तरी पवार साहेबांचेच नाव येईल : नरहरी झिरवाळ 

मी आदिवासी माणूस आहे . मी मेल्यानंतर माझी हाडे उकरलीतरी पवार साहेबांचे नाव तुम्हाला ऐकू येईल .
narhari-zirwal-
narhari-zirwal-

नवी दिल्ली:  मी मेल्यानंतर माझी हाडे जरी उकरली तरी त्यातून शरद पवार साहेबांचेच  नाव येईल ,असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काढले. 

श्री.झिरवाळ  नवी दिल्ली येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी वृत्तवाहिनीशी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुंबईहून विमानाने दिल्लीला गेलेल्या  राष्ट्रवादीच्या तीन-चार आमदारांमध्ये श्री. झिरवाळ  यांचा समावेश होता  . 

श्री .झिरवाळ पुढे म्हणाले ,माझे वडील हे साधीसुधी शेतकरी होते शरद पवार यांच्यामुळेच मी  आज जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे.  मला कुठलाही राजकीय वारसा नाही . माझ्याकडे आर्थिक पाठबळ नाही.  पवार साहेबांचा माणूस म्हणून लोक मला पैसे देतात आणि निवडूनही देतात . मी माझ्या आई-वडिलांनंतर शरद पवारांना मानतो.  

मी रोजगार हमीवर काम केलेला आहे . मी अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेला आहे . तिथून इथपर्यंतचे माझी वाटचाल  शरद पवार साहेब यांच्या नावावर झालेली आहे . शरद पवार साहेबांना मी कधीही धोका देऊ शकत नाही.  मी त्यांचा विश्वासघात कधी करू शकत नाही . मी आदिवासी माणूस आहे . मी मेल्यानंतर माझी हाडे उकरली  तरी पवार साहेबांचे नाव तुम्हाला ऐकू येईल . 


मी शून्यातून आलेलो आहे.  मी आहे त्याच्यावर समाधानी आहे . आणि साहेबांच्या मी बरोबरच आहे, असे त्यांनी सांगितले .

झिरवाळ म्हणाले पुढे  ,आम्हाला अंधारात ठेवण्यात आले , कल्पना देण्यात आली नाही . आम्हाला असे सांगण्यात आले की माननीय शरद पवार साहेब ,छगन भुजबळ साहेब ,जयंत पाटील यांच्या सल्ल्याने आपण भाजपबरोबर सरकार बनवत आहोत आणि तुम्ही बरोबर राहा. त्यानुसार राजभवनवर शपथविधी झाल्यानंतर आम्हाला चार जणांना दिल्लीला नेण्यात आले . दिल्लीला जाताना सुद्धा आमच्या बरोबर काही अधिकारी होते . मात्र आम्हाला त्यांची नावे माहिती नाहीत . 

झिरवाळ यांनी सांगितले,  दिल्लीत एका फार मोठ्या हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आले होते . एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मी आयुष्यात कधीच थांबलो  नव्हतो . मात्र तिथून बाहेर पडायचं तर मोठा पोलीस बंदोबस्त होता .

पोलीस  अधिकारी तिथं होते बाउंसर्स सुद्धा होते.  त्यामुळे तिथून जाणं अवघड होतं आणि कशीबशी सुटका करून घेतली .  आता इथं पवार साहेबांच्या निवासस्थानी आल्यानंतर मला शांत वाटत आहे. आता  शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर आमच्या जीवात जीव आला आहे. 
  
यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हेसुद्धा होते . गोडसे असे म्हणाले, झिरवाळ आणि  त्यांच्या सहकाऱ्यांना एका हॉटेलमध्ये   ठेवलेलं होतं त्या हॉटेलमध्ये पोलिस बंदोबस्त होता आणि माणसं सुद्धा होते ते अत्यंत परिश्रमाने सुटून आलेले आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com