चंद्रपूरमध्ये पुंगलिया-वडेट्टीवार गटात हाणामारी

चंद्रपूरमध्ये पुंगलिया-वडेट्टीवार गटात हाणामारी

विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र पुगलिया यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. वडेट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही त्यांचे प्रभूत्व असल्याने पुगलिया यांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस समितीवर वर्चस्व राखण्यावरून चंद्रपूर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरेश पुंगलिया व विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष हातघाईवर आला आहे. या दोन्ही गटांमध्ये शनिवारला हाणामारी झाली. 

सध्या कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार नरेश पुगलिया यांचे वर्चस्व आहे. त्यांनी कुणाचेही नेतृत्व समोर येऊ दिले नाही, असा आरोप केला जातो. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा केवळ एकच आमदार निवडून आलेला आहे. पुंगलियांना आतापर्यंत कुणीही आव्हान दिले नव्हते. 

विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र पुगलिया यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. वडेट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही त्यांचे प्रभूत्व असल्याने पुगलिया यांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. 

गेल्या वीस वर्षांपासून पुगलिया निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत होत आहेत. त्यांची लोकांमधील प्रतिमाही चांगली नसल्याने त्यांच्या ताब्यातून कॉंग्रेस निघेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये चैतन्य येणार नसल्याचे काही कॉंग्रेस नेत्यांची म्हणणे आहे. जिल्हा कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणुका इंटकच्या कार्यालयात होती. या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने हाणामारी झाली. परंतु लवकरच पोलिस आल्याने कार्यकर्त्यांना पांगविण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com