विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत नरेंद्र पाटील यांचे दबावतंत्र..! 

नरेंद्र पाटील यांच्यासोबत माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयदेव गायकवाड व अमरसिंह पंडित निवृत्त होत आहेत.
Narendra-Patil-MLC.
Narendra-Patil-MLC.

मुंबई :  विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसमधे दबावतंत्राचे राजकारण सुरू झाले आहे.  राष्ट्रवादीचे चार आमदार निवृत्त होत असताना केवळ एकच जागा निवडून येईल एवढेच संख्याबळ असल्याने पक्षनेतृत्वा पुढे पेच निर्माण झाला आहे. 

माथाडी कामगार नेते व विद्यमान विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवण्याचे संकेत दिले असून समर्थकांचा मेळावा घेत पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मिळावी असा दबाव टाकला आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास इतर पर्याय खुले असल्याचे सुतोवाच पाटील व त्यांच्या समर्थकांनी केल्याने पक्षांतर्गत नाराजी उघड झाली आहे. 

नरेंद्र पाटील यांच्यासोबत माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयदेव गायकवाड व अमरसिंह पंडित निवृत्त होत आहेत. यापुर्वी निरंजन डावखरे, सुरेश धस या सारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. या दोघांनाही भाजपने सर्व ताकद पणाला लावून विजयी केले. 

त्यातच नरेंद्र पाटील यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे संबध असून नवी मुंबई व माथाडी वर्गात वजन असलेल्या राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याला भाजप मधे खेचण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. एकापाठोपाठ एकेक नेता भाजपच्या वाटेवर जात असल्याने राष्ट्रवादी समोर आगामी निवडणूकांना सामोरे जाताना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com