उदयनराजे हे तरी सांगा, 1700 कोटींचा विकास कोठे केला? 

पाच वर्षांत ते या मतदारसंघाकडे फिरकलेही नाहीत.
उदयनराजे हे तरी सांगा, 1700 कोटींचा विकास कोठे केला? 

कऱ्हाड (सातारा):  केवळ गर्दीपुढे गाणी म्हणून अन्‌ लोकांचे मनोरंजन करुन मतदारसंघाचा विकास होत नाही आणि मतेही मिळत नाही. दहा वर्षांत सातारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नसताना विद्यमान खासदार 1700 कोटी रुपयांचा विकास निधी वापरला असल्याचे सांगत आहेत. त्यांनी निधी कोठून आणला अन तो नेमका कोठे वापरला तेच जाहीर करावे, असे आव्हान शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी दिले आहे. 

खटाव तालुक्‍यात मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, उदयनराजे भोसले साताराचे खासदार असले तरी ते कायम पुण्यातच असतात. पाच वर्षांत ते या मतदारसंघाकडे फिरकलेही नाहीत. विकासकामे राबवणे तर दूरच राहते. मी यात्रेपुरताच गावाकडे येत नाही. तर प्रत्येक महिन्यातून किमान एकदा गावी असतो. विधानपरिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात किती विकासकामे राबवली याचीही माहिती उदयनराजे भोसले यांनी मागवून घ्यावी. उदयनराजेंनी खासदार म्हणून काम करताना जिल्ह्याचा विकास, प्रगती मध्ये नेमके काय योगदान दिले ते देखील जाहीर करावे. केवळ गर्दीपुढे गाणी गाउन आणि लोकांचे मनोरंजन करुन मतदारसंघाचा विकास होत नाही किंवा मतेही मिळत नाही. यासाठी लोकांमध्ये जावून काम करावे लागते, त्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेउन त्या सोडवाव्या लागतात. जो माणूस मतदारसंघातील जनतेसाठी सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत वेळ देईल तोच यापुढे सातारचा खासदार होईल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com