पंतप्रधान मोदींच्या सभेचा भाजपच्या नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांना बुस्टर डोस

सुरुवातीला तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या मोदी आता कलम ३७० आणि पुलवामा हल्यांपासून अबालवृद्धांमध्येही प्रिय झाले आहेत. पिक विमा आणि शेतकरी निवृत्तीवेतन योजनेमुळे आता शेतकऱ्यांमध्येही त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेचा भाजपच्या नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांना बुस्टर डोस

बीड : परळी येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा माजलगाव व केजच्या भाजप उमेदवारांसाठी बुस्टर डोस ठरली आहे. दोन्ही मतदार संघाच्या परळी जवळ असल्याने या दोन्ही ठिकाणांहून हजारो भाजप कार्यकर्ते आणि सामान्यांची सभेला गर्दी होती.

मोदींनी आपल्या भाषणातून तरुण, अबालवृद्ध  आणि शेतकऱ्यांना भावणारे मुद्दे उपस्थित केल्याने या वर्गात सध्या मोदींच्याच भाषणाची चर्चा आहे. त्यामुळे या सभेचा फायदा माजलगावचे उमेदवार रमेशराव आडसकर आणि केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना होणार आहे.

केज व माजलगाव मतदार संघाची सामाजिक रचना आणि राजकीय इतिहास भाजप पुरक असाच आहे. केजमधून नमिता मुंदडा तर माजलगावमधून रमेशराव आडसकर हे दोन्ही भाजपने तरुण चेहरे रिंगणात उतरविले आहेत.

दरम्यान, सुरुवातीपासूनच दोघांनीही नियोजनबद्ध् प्रचार यंत्रणा लावली आहे. आता प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या दोन्ही उमेदवारांसाठी बुस्टर डोस ठरत आहे. माजलगाव व केज हे दोन्ही मतदार संघ परळीच्या जवळ असल्याने सभेची चर्चा परळीइतकीच या दोन्ही मतदार संघात झाली. 

तसेच, सभेसाठी उपस्थितांमध्ये माजलगाव व केजच्या मतदारांची तुलनेने अधिक हजेरी होती. मोदींनी सभेत तरुणांना व सामान्यांना भावणारा काश्मिरचे कलम ३७० चा मुद्दा मांडला. तसेच, आगामी काळात घराघरांत पाणी योजना, शेतकऱ्यांसाठीची निवृत्तीवेतन, पिक विमा या योजनांसह प्रत्येकाला हक्काचे घर, मोफत गॅस, मोफत आरोग्य योजना व सर्वांसाठी मोफत स्वच्छतागृहाचा मुद्दा मांडून सर्वच वर्गांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला.

सामान्यांसाठीच्या योजनांचा भाजप उमेदवारांकडून अगोदरपासून प्रचार सुरु होताच. आता खुद्द मोदींनी यावर प्रकाश टाकल्याने मतदारांत अधिक उत्साह संचारला आहे. मतदार संघात सध्या मोदींच्याच भाषणाची चर्चा होत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com