Narendra Modi will be in Shirdi on 19 October | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

नरेंद्र मोदी  19 तारखेला शिर्डीत 

सतीश वैजापूरकर
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

राहाता /शिर्डी  : " साई समाधि शताब्दी वर्षाची सांगता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणावीस तारखेस येथे येत आहेत. साईसंस्थानच्या शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नियोजित दर्शन बारीचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. तसेच यावेळी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात उभारण्यात आलेल्या दोन लाखाहून अधिक घरकुलांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाईल," जिल्हाचे संपर्कमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहीती दिली. 

 राम शिंदे म्हणाले," राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदि पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित रहातील. गेल्या ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साई समाधि शताब्दी वर्षास प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांगता होईल."

आज त्यांनी येथे येऊन पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यांच्या समावेत साईसंस्थान चे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर आदि पदाधिकारी तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोर्जे, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित  होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख