narendra modi will be in Jalgaon on sunday and in pune on thursday | Sarkarnama

नरेंद्र मोदी रविवारी जळगावात तर गुरुवारी पुण्यात 

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

..

मुंबई :  विधानसभेच्या 288 जागांचा प्रचार शिगेला पोहचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 तारखेपासून महाराष्ट्रात 9 सभा घेणार आहेत. भाजपच्या उमेदवारांसाठी मोदी राज्यात पहिली सभा जळगाव जिल्हयात घेणार आहेत. तसेच येत्या 18 तारखेला मोदी मुंबईत महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप-शिवसेनेच्या संयुक्‍त सभेला संबोधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी 9 प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 या पत्रकार परिषदेला भाजप राष्ट्रीय माध्यम विभाग सह प्रमुख संजय मयुख , प्रदेश मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर , महिला मोर्चा प्रदेश प्रमुख माधवीताई नाईक , प्रदेश सह मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये , प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.

स्मृती इराणी यांनी सांगितले की , पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्‍टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे . याच दिवशी पंतप्रधानांची साकोली ( जि. भंडारा ) येथेही सभा होणार आहे. 16 ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला , पनवेल आणि परतूर , येथे तर 17 ऑक्‍टोबर रोजी पुणे, सातारा , परळी येथे सभा होणार आहेत. 18 ऑक्‍टोबर रोजी मुंबई येथील सभेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची सांगता होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख