narendra modi talk with womens from satara | Sarkarnama

साताऱ्यातील महिलांशी बोलताना मोदींना झाली खटावच्या इनामदारांची आठवण! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018


दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव आहे. 

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान निवास योजनेच्या लाभार्थी महिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन संवाद साधला. त्यावेळी मोदींनी सातारा जिल्ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. 

मोदींनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मोदी जाहीर सभेच्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान निवास योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधला. नंदुरबार, ठाण्यानंतर साताऱ्याच्या महिलांनी आपले अनुभव सांगितले. 

मोदींच्यामुळे चांगले घर मिळाले. गरिबांना आधार मिळाला, तुम्ही आम्हाला देवासारखे आहात, असे महिला म्हणाल्या. 
कोरेगाव तालुक्‍यातील धामणेरच्या महिलेने घर मिळाल्यामुळे आनंद सांगितल्याचे सांगितले. 

त्यावर मोदींनी घर गळते कां, असे विचारले.
उत्तरादाखल त्या महिलेने 'नाही' असे उत्तर दिले. 
मग मोदी म्हणाले, 'तुम्ही मला खरं सांगत नाही'? 
तरीही, महिलांनी घर गळत नसल्याचे सांगितले. 
त्यावर मोदी म्हणाले, आपण स्वत: बांधले तरी गळतेच की. 
यंदा महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे घर गळाले नसेल, असे मोदी म्हणाले. 

मोदी पुढे म्हणाले, साताऱ्याशी माझे अद्‌भूत नाते आहे. माझ्या सुरवातीच्या काळात गुरु लक्ष्मणराव इनामदारांचे मला मार्गदर्शन मिळाले. त्यांना वकिलसाहेब म्हणून ओळखतात. त्यांच्यामुळे मी घडलो. ते साताऱ्याचे आहेत. त्यामुळे माझे विशेष नाते आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख