पंतप्रधान मोदींनी घेतली नागपुरातील मच्छीमारांची दखल

.
Narendra_modi
Narendra_modi

नागपूर :  सेंट्रल एव्हेन्यूच्या बजेरिया येथील भोई समाजावर महापालिका आणि सुधार प्रन्यास करित असलेल्या अन्यायाच्या तक्रारीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे.

मच्छीमार बांधवांनी केलेल्या तक्रारीचे निवेदन राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे.

विकासासाच्या नावाखाली बजेरियातील छोट्या-मोठ्या मासे विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. त्यांची घरेही महानगरपालिका व सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांकडून उध्वस्थ केली असल्याचे समाजातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना कळविण्यात आले होते. भोई समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी विनंतीही त्यांनी निवेदनातून केली होती. 

याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे निवेदन पाठविले. पंतप्रधान कार्यालयाने भारतीय भोई विकास मंडळाला एका पत्राद्वारे तसे कळविले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ऍड. दादासाहेब वलथरे
यांनी सांगितले. राज्य शासन या निवेदनावर कोणती कार्यवाही करेल याकडे आमचे लक्ष लागले असल्याचे ऍड. वलथरे म्हणाले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com