मोदी अजूनही भारतात लोकप्रिय; सर्व्हेक्षणातून स्पष्ट - Narendra Modi is Still Most Popular in India | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी अजूनही भारतात लोकप्रिय; सर्व्हेक्षणातून स्पष्ट

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आपला करिष्मा दाखवत मिळविलेल्या विजयामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. आता तीन वर्षांनंतरही मोदी भारतात लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानावर असल्याचे अमेरिकेतील थिंक टँक कंपनीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आपला करिष्मा दाखवत मिळविलेल्या विजयामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. आता तीन वर्षांनंतरही मोदी भारतात लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानावर असल्याचे अमेरिकेतील थिंक टँक कंपनीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

प्यू या थिंक टँक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून एक राजकारणी म्हणून मोदींनी 'अव्वल' स्थान प्राप्त केले आहे. या सर्व्हेक्षणात 2464 जणांकडून माहिती विचारण्यात आली. यामध्ये मोदींना 88 टक्के मते मिळाली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मोदींपेक्षा 30 टक्के मते कमी मिळाली आहेत. राहुल गांधींना 58 टक्के मते मिळाली असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राहुल यांनी मागे टाकले आहे. सोनिया गांधी यांना 57 टक्के मते मिळाली असून, त्या मोदींपेक्षा 31 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 39 टक्के मिळाली आहेत.

भारतात हा सर्व्हे फेब्रुवारी 21 ते 10 मार्चदरम्यान घेण्यात आला होता. प्यूने म्हटले, की मोदींची लोकप्रियता ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उचलण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानुसार वाढत आहे. दहा पैकी आठ भारतीयांनी अर्थव्यवस्था चांगली असल्याचे म्हटले आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींच्या लोकप्रियतेची टक्केवारी 19 इतकी होती. मात्र, आता यामध्ये वाढ झाली आहे. याशिवाय अर्थव्यवस्था फार चांगली आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्याही गेल्या तीन वर्षांत तिप्पटीने वाढली आहे.

प्यूच्या मते, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगण या दक्षिणेतील राज्यांत आणि महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगड या पश्चिमेकडील राज्यात त्यांच्याबाबत अनुकूल वातावरण असल्याने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. याशिवाय, उत्तरेकडील 2015 पासूनची असणाऱ्या मोदींच्या लोकप्रियतेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच पश्चिम आणि दक्षिणेत त्यांची लोकप्रियता कायम आहे. मात्र, पूर्वेकडील राज्यात त्यांची लोकप्रियता घटत चालली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर भारतातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख