नरेंद्र मोदींची होणार साताऱ्यात सभा

नरेंद्र मोदींची होणार साताऱ्यात सभा

सातारा : भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात जाहीर सभा होणार आहे. ही सभा सैनिक स्कूलच्या मैदानावर कोजागरी पौर्णिमेदिवशी (ता. 13) किंवा गुरुवारी (ता. 17) ऑक्टोबरला होणार आहे. यामुळे उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोकसभेची पोट निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्ष्याचे अधिक गांभीर्याने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात तब्बल दहा सभा होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या चार जागा जिंकण्यासाठी रणनिती अवलंबली आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत वातावरण बदलण्याची तयारी केली आहे.

 मोदींची सभा झाल्यास सातारा लोकसभेसह विधानसभा निवडणुक सोपी होईल,  अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी 13 तारखेला कोजागरी  पौर्णिमेदिवशी किंवा गुरुवारी (ता. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी सैनिक स्कूलचे मैदान बुक केले आहे. आता साताऱ्यात होणाऱ्या मोदींच्या सभेच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com