आजचा वाढदिवस : नरेंद्र मोदी, पंतप्रधान. - narendra modi pm of india | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत. 2001 ते 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या व हिंदुत्ववादी प्रतिमेच्या बळावर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचा प्रभाव दाखवत, निवडणुकीची सारी सुत्रे हाती घेत भाजपला संपूर्ण बहुमत मिळवून दिले. ते संघाचे स्वयंसेवक व हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. 

गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. केशुभाई पटेल यांच्यानंतर ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण झाली. अडवानी यांच्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंत्योदय, बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी, नोटाबंदी, जीएसटी, स्वच्छता अभियान, सर्वांसाठी घरे योजना, जन-धन योजना, इत्यादी योजना राबवून त्यांनी जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 
आकाशवाणीवरून " मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर देशातील काही मोजकी राज्य वगळता देशात सर्वत्र भाजपने सत्ता हाती घेतली. 2019 मध्ये होणारी निवडणूक ही त्यांचा नेतृत्वाखाली लढवून पुन्हा देशात भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख