उदयनराजेंशी पंतप्रधान मोदींनी केली एकांतात चर्चा 

cm-pm-udayanraje.
cm-pm-udayanraje.

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकांतात चर्चा  केली .  या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते . 

नाशिक येथे जाहीर सभा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे भोसले या तिघांची सभास्थळी असलेल्या ग्रीन रूममध्ये ही चर्चा झाली . ही चर्चा सुमारे दहा मिनिटे झाली . ही चर्चा पूर्वनियोजित नव्हती असे समजते . 
छत्रपती उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून पुन्हा भाजपत दाखल झाल्यानंतर   'ते राजे आम्ही त्यांचा हुकुम ऐकणार 'अशी भाषा भाजपच्या नेतृत्वाने सुरु केली आहे . 

दिल्लीतील पक्षप्रवेशाला हजर रहाणे शक्य नसल्याने आज मोदींनी त्यांना अतिरिक्त वेळ दिला असावा असे मानले जाते. राज्यात उदयनराजेंना प्रचारासाठी फिरा असे सांगण्यात येणार आहे असे समजते . 

 उदयनराजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही भागात   लोकप्रिय आहेत .  तरुणवर्गात त्यांची क्रेझ आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या भागात भाजपतर्फे  उदयनराजेंना  सभा आणि रोड शो करण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते असे समजते . 

आजच्या नाशिक येथील जाहीर सभेत  उदयनराजेंनी शाही पगडी देऊन मोदींचा सत्कार केला.  मोदींनीही उदयनराजेंचा  हात हातात घेऊन उंचावत जनतेला अभिवादन केले.  महाराष्ट्रात भाजपमध्ये उदयनराजे यांना भविष्यात अधिक महत्व मिळेल असे दिसते . भाजपच्या उदयनराजेंवरील प्रेमाची वरिष्ठ नेतेमंडळीत चर्चा आहे .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com