Narendra Modi dominates ministers : Kushwah | Sarkarnama

नरेंद्र मोदींची मंत्र्यांमध्ये दहशत ,सर्व निर्णय पीएमओच घेते    : कुशवाह

सरकारनामा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे :  " केंद्रीय मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'डिक्‍टेट'च करतात. सर्व निर्णय पंतप्रधानांचे कार्यालयच (पीएमओ) घेते. सरकारमधील सर्व मंत्री किती दहशतीमध्ये असतात, याचा मला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही अनुभव आला आहे,'' असा गौप्यस्फोट   माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला . 

कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तीन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. भुजबळ आज पुण्यात असताना कुशवाह अचानक शहरात आले आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर एकत्रित झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुशवाह म्हणाले, "विकासाचा अजेंडा समोर ठेवून मोदींनी आम्हाला भुलवले होते; पण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून आता कोणतीही आशा राहिलेली नाही.'' 

"एनडीएच्या विरोधात महाआघाडीत सहभागी होणे किंवा स्वतंत्रपणे लढणे या पर्यायांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे," असेही त्यांनी सांगितले. 

श्री . कुशवाह यांचा बिहारच्या राजकारणात दबदबा आहे . ते  समता पक्षात असताना विरोधी पक्ष नेते होते . २०१३ मध्ये त्यांनी   राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली होती . त्यांचे छगन भुजबळ यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत . ते श्री . भुजबळ यांना गुरु मानतात .

छगन भुजबळ तुरुंगात असताना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये समता परिषदेच्या एका कार्यक्रमास हजर राहून त्यांनी भुजबळ सुटायला हवेत अशी मागणी दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत केली होती .छगन भुजबळ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते दिल्लीला गेले तेंव्हा त्यांचे केंद्रीय मंत्री असलेल्या  श्री. कुशवाह आणि समर्थकांनी जोरदार स्वागत केले होते . 

"मोदी सरकारच्या शेवटाला आता सुरवात झाली आहे,'' अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रसंगी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख