पुन्हा नवा फंडा : मोदींच्या भाषणाची 'गुंज' नागपूरच्या  चौका-चौकात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपतर्फे अत्याधुनिक टेकनॉलॉजीचा वापर निवडणूक प्रचारात केला जाताना आपण पाहतोय . कधी व्हीडिओ कॉन्फरन्स तर कधी व्हर्चुअल रियॅलिटीचा वापर करून एकाचवेळी पाच सभांतून जाहीर भाषण अशी कामगिरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे . आज नागपूर मेट्रोच्या उदघाटनासाठी वापरण्यात आलेला नवा फंडा जाणून घ्या .
Modi-&-Traffick-speakers.
Modi-&-Traffick-speakers.

नागपूर : एरवी वर्दळीच्या चौकांमध्ये 'आगे बढो, पिछे हटो' अशा सूचना वाहतूक पोलिसांच्या बुथमधून ऐकायला मिळतात. मात्र आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सिग्लनवर लावण्यात आलेल्या स्पिकमधून ऐकवण्यात आले.

नागपूर शहरात जवळपास 72 ट्राफिक सिग्नलवर स्पीकर लावण्यात आले आहेत. वाहतूत पोलिस विभागाचे 12 तर महानगर पालिकेचे 60 सिग्नलवर स्पीकर आहेत. या स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना प्रधानमंत्री मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची भाषणे ऐकला मिळाली.  

निमित्त होते मेट्रो रेल्वेच्या लोकार्पणाचे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीवरून ई-शुभारंभ केला. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीमंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक नेते आणि अधिकारी उद्‌घाटनाला उपस्थित होते. पंतप्रधान यांच्या भाषणापूर्वी त्यांची भाषणे झाली. ही भाषणे  प्रसारित करण्यात आलीत. या स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना मेट्रो रेल्वेच्या शुभारंभाबाबतची माहिती मिळाली. प्रथमच या स्पीकरचा वापर भाषणांसाठी करण्यात आला.

मेट्रो रेल्वेचा  ई- शुभारंभ गुरुवारी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरस द्वारे झाला . नागपूरमध्ये याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधानांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व नितीन गडकरी यांचे भाषणे झाली. व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. याचे थेट प्रसारण ट्रॅफिक सिग्लवरून करण्यात आले. त्यामुळे उद्‌घाटनाच्यावेळी कामानिमित्त बाहेर असलेल्यांनाही भाषणे ऐकता आली. अनेक चौकात ही भाषणे ऐकण्यासाठी वाहन चालक काही वेळासाठी जमा झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com