मोदींनी केले फडणवीसांचे कौतुक आणि मानले पंकजा मुंडेंचे आभार 

शेंद्रा एमआयडीसीतील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडोअर अंतर्गत तयार होत असलेल्या ऑरीक सिटीच्या हॉलचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
Fadanvis_Modi
Fadanvis_Modi

औरंगाबादः ऑरिक सिटीच्या या हॉलचे आज लोकार्पण होत असल्याने हे शहर खऱ्या अर्थाने स्मार्टसिटी सोबतच औद्योगिक क्षेत्रातील विकासाचे केंद्रही बनत असल्याचे प्रतिपादन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले . शेंद्रा एमआयडीसीतील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडोअर अंतर्गत तयार होत असलेल्या ऑरीक सिटीच्या हॉलचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस  यांच्या कामाचे कौतुक केले . तसेच पंकजा मुंडे यांचा 'बहेन पंकजा' असा करीत त्यांचे विशेष आभार मानले . 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्य मंत्री दादासाहेब भुसे यांची यावेळी उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरीक (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) हॉलचे लोकार्पण केल्यानंतर राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याला मार्गदर्शन केले. ऑरिक व डीएमआयसीमुळे अनेक मोठ्या कंपन्या या भागात गुंतवणूक करण्यासाठी उत्सूक आहेत, यातून लाखो तरुणांना रोजगार मिळेल असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला.

सक्षम महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे गौरी विसर्जनाच्या दिवशी देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुक करत आभार देखील मानले. 'बहेन  पंकजा को विशेष धन्यवाद' अशा   शब्दात त्यांनी पंकजा मुंडे यांचा विशेष उल्लेख केला .   महिलांच्या सोबतीने राष्ट्रकल्याणाचा आपला संकल्प असल्याचे सांगतानांच मोदी म्हणाले, 1960 मध्ये राम मनोहर लोहिया यांनी महिलासाठी महत्वाच्या असलेल्या दोन गोष्टींचा उल्लेख केला होता, तो म्हणजे पाणी आणि शौचालय. महिलांचे हे प्रश्‍न सुटले तर त्यांचे जीवन सुसह्य होते.

महिलांना सक्षम करण्यासाठी जनधन खात्याच्या मार्फत 5 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ, मुद्रा योजनेच्या माध्यमतातून महिलांना व्यवसायासाठी 1 लाखांचे कर्ज सरकारकडून दिले जात आहे. त्यातून स्वयं सहायता समुहाल बळ मिळत असून सामाजिक परिवर्तनात देखील त्यांचा मोठा सहभाग वाढत असल्याचे मोदी म्हणाले.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही घर घर पाणी पोचवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. येणाऱ्या पाच वर्षात या अभियानावर आम्ही सोडतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. प्रत्येक घरात शौचालय आणि पाण्याने भरलेले घर असेल. महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटरग्रीडच्या माध्यमातून फडणवीस सरकार करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही मोदींनी सांगितले.

2022 पर्यंत प्रत्येकाला घर..

देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी आम्ही काम करतो आहोत. पण यावर विरोधक म्हणतात . या गोष्टी तर आम्ही देखील करत होतो. पैसे आम्हीही द्यायचो, तुम्ही नवीन काय करत आहात?

त्यांना मी सांगू इच्छितो, आम्हाला हाऊस नाही, तर होम द्यायचे आहे. नुसत्या चार भिंतीचे घर न देता त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबांच्या गरजा ओळखून सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत 1 कोटी 80 लाख घरे दिल्याचे देखील मोदी यांनी यावेळी सांगितले. लवकरच देशातील प्रत्येक घरात शौचालय असेल आणि देश पाणंदमुक्त होईल असा विश्‍वास देखील त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com