जबरदस्त नेता कोण ? आणि जबरदस्ती नेता कोण ? हे लवकरच कळेल : मौर्य 

जबरदस्त नेता कोण ? आणि जबरदस्ती नेता कोण ? हे लवकरच कळेल : मौर्य 

लखनौ : गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्ये भाजपच जोरदार मुसंडी मारेल तसेच "जबरदस्त नेता कोण? आणि "" जबरदस्तीचा नेता कोण ? हे या दोन्ही निवडणुकांचे निकाल दाखवून देतील असे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मौर्य यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. कॉंग्रेसकडून गुजरातमध्ये जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे. लोकांच्या भावना भडकवून त्यांना कधीही विजय मिळविता येणार नाही असे स्पष्ट करून मौर्य म्हणाले, की गुजरातमध्ये आम्हीच विजयी होणार आहोत. यामध्ये कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. तेच चित्र हिमाचलप्रदेशमध्ये पाहण्यास मिळेल. गुजरातमध्ये फक्त एकच नेता आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे निकाल लागल्यानंतर ते किती जबरदस्त नेता आहेत हे स्पष्ट होईल आणि जबरदस्ती नेता कोण हे ही स्पष्ट होईल. त्यासाठी मात्र आणखी काही दिवस प्रतीक्षाही करावी लागणार आहे. 

कॉंग्रेसला मतदार त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वासही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com