मुंबईमध्ये परिवर्तनाला सुरवात झालीय - नरेंद्र मोदी

मुंबईमध्ये परिवर्तनाला सुरवात झालीय - नरेंद्र मोदी

मुंबई : मुंबईत परिवर्तनाच्या कामाला सुरवात झाली आहे. हजारो कोटी रुपयांचे काम मेट्रोच्या माध्यमातून होत आहे. आता मुंबईत 11 किलोमीटर मेट्रो आहे येत्या काही वर्षात त्यामध्ये भर पडून हे काम 325 किलोमीटरपर्यत जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मेट्रोच्या वेगाने होत असलेल्या कामाबद्दल माहिती देऊन ते म्हणाले, मुंबईच्या वेगाचे आणि मुंबईकरांच्या स्पिरीटचे मला कौतुक आहे, देशाची गती मुंबईच्या गतीवर अवलंबून आहे. इस्त्रो मधील वैज्ञानिकांची जिद्द आणि त्यांचे स्पिरीट आणि मुंबईकरांचे स्पिरीट कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोमुळे किमान पन्नास हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आपल्या भाषणात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. 


मुंबईत आज मेट्रोच्या तीन मार्गांचे भूमीपूजन करण्यात आले. त्याचबरोबर मेट्रोच्या विविध कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करणयत आले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेताना आवर्जून मराठीतून माझे धाकटे भाऊ उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. त्याचबोरबर गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा माठीतून सर्व उपस्थितांना दिल्या. राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंह कोशीयारी यांचे नाव घेऊन त्यांचे त्यांनी कौतुक केले. उत्तराखंडमध्ये मी प्रभारी म्हणून काम करत असताना त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरवाने उल्लेख करून मेट्रोच्या कामाला त्यांनी जो वेग दिला आहे तो कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जनतेने आम्हाला काम करण्याची जी संधी दिली आहे त्याचा मी सदुपयोग करतआहोत ऐतिहासिक आणि देशाला पुढे नेणारी कामे आम्ही करत आहोत असा विश्‍वासही त्यांनी व्क्त केला. देसातली प्रत्येक माणसाने एक संकल्प केला पाहिजे असे सांगून त्यांनी श्रोत्यांना तुम्ही संकल्प करणार का ? आणि त्याचे कसोशीने पालन करणार का ? असे विचारले. यावेळी गणेशविर्सजनाच्यावेळी समुद्रात कुठल्याही प्रकारचे प्लॅस्टीक आणि प्रदुषण करणारे घटक जाऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com