narendra modi anaugaration on small scale industry | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी नवी दिल्लीत उद्‌घाटन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) तत्काळ कर्ज देण्यासाठी केंद्राकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "एमएसएमई 100 दिवस' या मोहिमेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 2) होणार आहे. या वेळी किमान 200 उद्योजकांना एक कोटीपर्यंत कर्ज तत्काळ मंजूर केले जाणार आहे. 

अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आणि एकूण कारखाना उत्पादनात 40 टक्के वाटा असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांची अवस्था बिकट आहे. यामुळे रोजगारनिर्मितीला खीळ बसली आहे. मंदीसदृश परिस्थितीशी सामना करणाऱ्या या उद्योजकांना तातडीने पतपुरवठा करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने "सिडबी'च्या नेतृत्वात सार्वजनिक बॅंकांकडून केवळ 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूर केले जाणार आहे. ही विशेष मोहीम 100 दिवस चालणार आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील 79 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. 

उद्योजक आणण्याची जबाबदारी बॅंकांवर 
विज्ञान भवनात होणाऱ्या या सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी 200 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना संबोधित करणार आहेत. त्याच वेळी 78 ठिकाणांहून या कार्यक्रमाशी जोडलेल्या उद्योजकांशी संवाद साधतील. या सोहळ्यासाठी उद्योजक आणण्याची जबाबदारी बॅंकांवर सोपवण्यात आली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही मोहीम राबवली जात असल्याचे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने व्यक्‍त केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख