पंतप्रधान मोदींना "ऑर्डर ऑफ झायेद' 

Narendra Modi after receiving Order of Zayed, UAE's award
Narendra Modi after receiving Order of Zayed, UAE's award

अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज "ऑर्डर ऑफ झायेद' या संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. अबुधाबीचे युवराज शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांच्या हस्ते मोदींचा हा गौरव करण्यात आला. 

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या "यूएई' दौऱ्यावर आहेत. या वेळी मोदींनी नाहयान यांच्याबरोबर विविध मुद्यांवर चर्चाही केली. भारत आणि यूएई दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक समृद्ध करण्यासाठी ही चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. 

मोदी हे मला भावासारखे आहेत आणि हा देश म्हणजे त्यांचे दुसऱ्या घरासारखाच आहे, असे युवराजांनी या वेळी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी अबुधाबीत रुपे कार्डचे उद्‌घाटन केले. इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटची भारतीय यंत्रणा सुरू केलेला यूएई हा पहिला आखाती देश ठरला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com