narendra modi | Sarkarnama

सुरक्षा प्रोटोकॉल थांबवून मोदींनी घेतली छकुलीची भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एसपीजी जवानांचे कडे तोडून एक चिमुरडी मोदींच्या गाडीजवळ पोहोचल्याने सुरक्षा रक्षकांची प्रचंड धावपळ उडाली. मोंदीकडे जाणाऱ्या या मुलीला सुरक्षा रक्षकांनी घेरले. मात्र तितक्‍यात स्वत: मोदींचे लक्ष त्या मुलीकडे गेले असताना त्यांनी त्या मुलीला जवळ बोलावले. दोन मिनिटात ही मुलगी पुन्हा परतल्यानंतर सुरक्षा रक्षकांचा जीव कोठे भांड्यात पडला. 

त्याचे झाले असे की मोदी आज किरण मल्टी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या उद्घाटनासाठी सुरतला जात होते. यावेळी चार वर्षांची एक मुलगी सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून त्यांच्या गाडीजवळ धावत गेली. ही मुलगी मोदींच्या गाडीजवळ जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीला अडवले. सुरक्षा रक्षकांनी तिला मागे जाण्याचा आदेश दिला. पण, मोदींचे त्या मुलीकडे लक्ष गेले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना इशारा करत तिला आणण्यास सांगितले. 

मोदी यांनी मुलीला गाडीत घेतले आणि तिला तुझे नाव काय असे विचारले. दोन मिनिटे बोलून झाल्यानंतर तिला पुन्हा तिच्या आईबाबांकडे जाण्यास सांगितले. या मुलीचे नाव नॅन्सी गोंदालिया आहे. नॅन्सीचे वडील सुरतमध्ये हिरे कामगार आहेत. मुलीने मोदींची भेट घेतल्याचा आनंद व्यक्त करताना तिच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आणि एैतिहासिक आहे. माझ्या मुलीला मोदींना भेटण्याची खूप इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण झाली याचाच आम्हाला आनंद आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख