narendra dabholka murder not find sushilkumar shinde | Sarkarnama

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण शोध लागला नाही, सुशीलकुमार शिंदेंची खंत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

सोलापूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध आम्ही घ्यायचा खूप प्रयत्न केला परंतु शोध लागला नाही, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केली.

सोलापूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध आम्ही घ्यायचा खूप प्रयत्न केला परंतु शोध लागला नाही, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केली.

 डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतीनिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. फडकुले साहित्यसेवा पुरस्काराने डॉ. दाभोळकर व समाजसेवा पुरस्काराने शिंगवे (जि. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र व डॉ. सौ. सुचेता धामणे यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्यासह स्वामी विवेकानंद, संत तुकाराम महाराज व डॉ. निर्मलकुमार फडकुले हे परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते होते. 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की माऊली प्रतिष्ठानने माणूसपण गमावलेल्या माणसांना माणुसकी दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध आम्ही घ्यायचा खूप प्रयत्न केला परंतु शोध लागला नाही. अशा विघातकांचा बंदोबस्त मनपरिवर्तनातून होईल. 

डॉ. दाभोळकर म्हणाले, की आताच्या परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा मार्ग स्वामी विवेकानंद, संत तुकाराम महाराज व डॉ. निर्मलकुमार फडकुले या तिघांच्या विचारातून मिळतो. धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा लागेल. स्वामी विवेकानंद यांचे मर्यादित विचार समाजापुढे आणण्यात आले आहेत. आजच्या स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे जातीबद्दलचे व धर्माबद्दलचे विचार उपयुक्त आहेत. परिवर्तनवादी व्यक्तीमत्वाच्या नावाने मला दिलेला पुरस्कार हा माझ्यासाठी सन्मानजनक व अभिमानास्पद आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख