Naredra Modi's Kalyan Tour Crematorium Closed | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
राष्ट्रवादीने वेळ वाढवून मागितल्याची सूत्रांची माहिती
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांची शिफारस

पंतप्रधानांचा कल्याण दौरा : स्मशानभूमी बंद, तीन विवाह तडकाफडकी रद्द तर डंपिग ग्राऊंडवर अत्तराचे फवारे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मोदी यांची सभा दुपारी अडीच वाजता असून ते कल्याणच्या बाहेर जाईपर्यंत या स्मशानभूमित एकही अंत्यसंस्कार होणार नाही. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान कार्यक्रमाच्या मार्गावरच वाधवा मंगल कार्यालय असून इथे आज तीन विवाह होणार होते. मात्र, हे तिन्ही विवाह मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तडकाफडकी रद्द करण्यात आले आहेत.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कल्याण दौऱ्यानिमित्त कल्याण शहर चकाचक करण्यात आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मोदी यांची सभा ज्या फडके मैदानावर होत आहे तिथे जवळच लालचौकी स्मशान भूमी आहे. मात्र या स्मशानभूमीला आज टाळे ठोकण्यात आले आहे.  

मोदी यांची सभा दुपारी अडीच वाजता असून ते कल्याणच्या बाहेर जाईपर्यंत या स्मशानभूमित एकही अंत्यसंस्कार होणार नाही. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 
दरम्यान कार्यक्रमाच्या मार्गावरच वाधवा मंगल कार्यालय असून इथे आज तीन विवाह होणार होते. मात्र, हे तिन्ही विवाह मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने नवदांपत्याचा मुहूर्त हुकला आहे. 

फडके मैदानाच्या काही अंतरावरच गणेशघाट शेजारी शहराचे डंपिग ग्राऊंड आहे. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असते. या दुर्गंधीचा त्रास कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना होऊ नये यासाठी अत्तराचे फवारे मारण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाला येणाऱ्यांनी काळे कपडे घातले असतील तर त्यांना मैदानात प्रवेश देवू नका अशा सूचनाही पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख