Naredra Modi Pays Respects to Chatrapati Shivaji Maharaj | Sarkarnama

नरेंद्र मोदींनी केले छत्रपतींना नमन; मराठीतून केले ट्वीट

वृत्तसंस्था
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

भारतमातेच्या सुपुत्राला माझे नमन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्यशीलपणा, दयाशीलता आणि सुप्रशासन याचे उत्तम उदाहरण. त्यांचे कार्य लाखो लोकांना कायम प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य लाखो लोकांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी ट्विट करून अभिवादन केले.

भारतमातेच्या सुपुत्राला माझे नमन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्यशीलपणा, दयाशीलता आणि सुप्रशासन याचे उत्तम उदाहरण. त्यांचे कार्य लाखो लोकांना कायम प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे आणि कुशल प्रशासक होते. उत्तम नौदल उभारण्यापासून ते लोकोपयोगी धोरणे आखण्याचे काम त्यांनी केले. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ते कायमच सर्वांच्या लक्षात राहतील, असेही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख