नारायणगावात पोटेंचा बोलबाला; खासदार आढळरावांचा शब्द खरा ठरला

नारायणगावात पोटेंचा बोलबाला; खासदार आढळरावांचा शब्द खरा ठरला

नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या तिरंगी लढतीत सर्वपक्षीय मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे शिवसेनेचे उमेदवार योगेश ऊर्फ बाबू नामदेव पाटे हे 5 हजार 792 मते मिळवून मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले.

सदस्यांच्या सतरा जागांपैकी मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेलचे पंधरा उमेदवार तर श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेलचे सर्व सदस्य मोठ्या फरकाने पराभूत झाले. पाटे यांनी कोऱ्हाळे यांच्या सलग बावीस वर्षाच्या ग्रामपंचायत मधील सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळवले. या ऐतिहासिक विजयामुळे कार्यकर्त्यांच्या "बाबूभाई सच्चा है'या घोषणांनी व फटाक्‍यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला.

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाटे यांच्यासाठी प्रचार केला होता. मोठे नेते हे गाव पातळीवरील निवडणुकीत लक्ष घालत नाहीत. मात्र आढळराव यांनी कोऱहाळे दादा यांच्या विरोधात केलेला प्रचार हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आढळराव यांनी प्रचाराच्या सांगता सभेत येऊन पाटेंसाठी मतदान मागितले होते. त्यामुळे गल्लीतील दादांच्या पराभवासाठी दिल्लीतील दादा उपयोगी ठरल्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली. 

सदस्यापदाचे पॅनेलनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते):

मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेल:प्रभाग क्र.1:अरिफ आतार(710), ज्योती दिवटे(559).

प्रभाग क्र.2: संतोष दांगट(1 हजार 72), रूपाली जाधव(1 हजार 14),

प्रभाग क्र.3:अश्‍विनी गभाले(1 हजार 259), अनिता कसबे(1 हजार 149),सारिका डेरे(1 हजार 264),

प्रभाग क्र.4:विजय वाव्हळ(842),राजेश बाप्ते(1 हजार 12),सुप्रिया वाजगे-खैरे(1 हजार 89),

प्रभाग 5 : कुसुम शिरसाट (593),पुष्पा आहेर (682),

प्रभाग 6:गणेश पाटे(1 हजार 725),मेहेत्रे मनीषा(1 हजार 606),रचना वाजगे(1 हजार 343)

.श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेल: प्रभाग 1: संतोष पाटे(638),प्रभाग क्र.5: रामदास अभंग (580).

पाच विद्यमान सदस्य पराभूत: दहा विद्यमान सदस्य निवडणूक रिंगणात होते. या पैकी उपसरपंच संतोष पाटे,रामदास अभंग, ज्योती दिवटे, योगेश पाटे, गणेश पाटे हे विजयी झाले. तर अमित कोऱ्हाळे, संतोष वाजगे, सीमा बोऱ्हाडे,माधुरी वालझाडे, माजी सरपंच जयश्री मेहेत्रे हे पराभूत झाले.
प्रभाग क्र.1मध्ये माजी सरपंच ज्योती दिवटे(559) व सरिता मावळे(557) यांच्यात चुरशीची लढत झाली.दिवटे या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या.

वडिलांचे स्वप्न मुलाने केले पूर्ण

नामदेव पाटे हे ग्रामपंचायतीचे दोन वेळा सदस्य होते. नामदेव पाटे यांचे कोऱ्हाळे यांच्याशी मागील पंचवीस वर्षांपासूनचे राजकीय वैमनस्य सर्व परिचित आहे. पाटे यांनी मागील पाच निवडणुकीत चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्याशी केलेला निकराचा सामना निष्फळ ठरला होता. मात्र सहाव्या निवडणुकीत त्यांचा मुलगा योगेश यांनी कोऱ्हाळे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवून वडिलांचे सरपंचपदाचे स्वप्न अखेर पूर्ण केले.
कारभार पारदर्शक करू:

योगेश पाटे म्हणाले की मी व माझ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी कोऱ्हाळे यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला होता.ग्रामस्थांनी भ्रष्टाचार व एकाधिकार शाहीच्या विरोधात मतदान करुण परिवर्तन घडवून आणले आहे.ग्रामपंचायतीचा कारभार राजकारण विरहित व पारदर्शक करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com