narayan ranes party to merge with bjp at last | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

15 ऑक्टोंबर: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलीन होणार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ नयेत, यासाठी आम्ही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. 15) नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त कणकवलीत प्रचारसभा घेणार आहेत. या वेळी आयोजित जाहीर सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी येथे केली. 

सावंतवाडीत राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेले दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ नयेत, यासाठी आम्ही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. येथील जनतेने राजन तेली यांच्यासारख्या विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे. पालकमंत्री केसरकर या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत; मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांचे काम पाहिले असता निष्क्रिय आमदार म्हणून त्यांची वाटचाल राहिली.'' 

राणे म्हणाले, "कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष गलितगात्र झाले असून, ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकतर्फी होईल. कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवारी होणार आहे. यानंतर मी पक्ष देईल त्या ठिकाणी जाऊन प्रचारसभेची जबाबदारी पार पाडणार आहे.'' कणकवलीत शिवसेनेने युती तोडल्याबद्दल विचारले असतात त्याबाबत शिवसेनेने उत्तर द्यावे, असे राणे यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख