नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदीबाहेरचा : चंद्रकांत पाटील

नारायण राणेंचा विषय माझ्या ताकदीबाहेरचा : चंद्रकांत पाटील

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला पक्ष महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी राणेंचा विषय माझ्या ताकदी बाहेरचा आहे, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. ते म्हणाले, ``यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोघे मिळून निर्णय घेतील. त्यामुळे राणेंच्या विषयावर युती तुटण्याची अजिबात शक्यता नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती अचानकपणे जाहीरही होईल.``

भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. फक्त त्याच्यावर गुन्हे नसावेत. प्रसार माध्यमांत जी नावे भाजप प्रवेशासाठी म्हणून प्रसिद्ध होत आहेत, ते सर्वजण भाजपमध्ये येणार असल्याचे सांगत त्यांनी या बातम्यांना दुजोरा दिला. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा भाजप प्रवेश निश्चित असला तरी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी खुद्द उदयनराजेंची इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, "ते राजे आहेत, त्यांची तीही इच्छा पूर्ण करु', असे म्हटले आहे. 
भाजप प्रवेशासाठी उदयनराजे यांच्या काही औपचारिक बाबी अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय त्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडता येणार नाही. या बाबी पूर्ण व्हायच्या असल्याने त्यांचा प्रवेश लांबल्याचे चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले.

विधानसभेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होणार आहे. त्या कालावधीपर्यंत उदयनराजेंच्या सातारा पोटनिवडणुकीची तयारी करणे शक्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची उदयनराजेंची तीही इच्छा पूर्ण करु, असे सांगत पाटील म्हणाले, 'उदयनराजे यांनी आता राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला तरी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होईल असे वाटत नाही. कारण त्यासाठी नोटिफिकेशनसाठी अवधी लागू शकेल. भाजप प्रवेशासाठी सध्या रांग असून काही प्रवेश एक सप्टेंबरला तर उर्वरीत प्रवेश टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. 

पाटील पुढे म्हणाले, 'भाजप-सेना युती होण्यात काहीच अडचण नसून कोणत्याही क्षणी युती जाहीर होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीसारखी अचानकपणे युतीची घोषणा होणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com