राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशनाचा मुहुर्त अनिश्‍चित ? सेनेवरील टिकेमुळे भाजप नेते हजर रहाण्यास अनुत्सुक 

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र इंग्रजीत तयार आहे. हार्पर कॉलीन्सने ते विक्रीसाठी उपलब्धही केले आहे पण मराठी भाषेतील या पुस्तकाच्या प्रकाशनाला अदयाप मुहुर्त मिळालेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे पुत्र उदधव ठाकरे यांनी घराबाहेर जाण्याची धमकी दिली होती ,ते माझ्याविरोधात होते असा तपशील या पुस्तकात दिला असल्याने भाजपच्या कोणत्याही नेत्याने या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहू नये अशी सेनेची अपेक्षाआहे.
राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशनाचा मुहुर्त अनिश्‍चित ? सेनेवरील टिकेमुळे भाजप नेते हजर रहाण्यास अनुत्सुक 

मुंबई : स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र इंग्रजीत तयार आहे. हार्पर कॉलीन्सने ते विक्रीसाठी उपलब्धही केले आहे पण मराठी भाषेतील या पुस्तकाच्या प्रकाशनाला अदयाप मुहुर्त मिळालेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे पुत्र उदधव ठाकरे यांनी घराबाहेर जाण्याची धमकी दिली होती ,ते माझ्याविरोधात होते असा तपशील या पुस्तकात दिला असल्याने भाजपच्या कोणत्याही नेत्याने या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहू नये अशी सेनेची अपेक्षाआहे. 

सेनेच्या सत्ताकाळात मुख्यमंत्रीपदावर असलेल्या मनोहर जोशी यांनी मात्र या पुस्तकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.ठाकरे कुटुंबाच्या कृपेने राज्यातले सर्वोच्च पद मिळाले आता त्यांच्यावर जाहीर टीका करणे हे योग्य नसल्याचे मत मनोहर जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्‍त केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रप्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी हजर रहावे अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती.मात्र सेनेविरोधात विशेषत: उदधव ठाकरेंविरोधात राणे यांनी पुस्तकात बरेच गरळ ओतले असल्याने फडणवीस यांनी तेथे जावू नये अशी सेनेची अपेक्षा आहे. भाजपच्या नेत्यांशी आमची युती आहे,उदधवसाहेबांबददल अनुदार नोंदी करणाऱ्या समारंभाला आमच्या मित्रांनीच हजर रहाणे आम्हालाआवडेल काय, असा प्रश्‍न सेनेच्या एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने केला.

8मे ते 10 मेच्या आसपास हा कार्यक्रम व्हावा अशी आखणी होती मात्र मराठी प्रकाशनाच्या समारंभाची तारीख अदयाप निश्‍चित झालेली नाही असे राणे यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्‍त केली. 'नो होल्डस्‌ बार्ड' असे इंग्रजीतील आत्मचरित्राचे नाव आहे. मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर आहेत,ते मुंबईत परतल्यावर मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असल्याचे राणे म्हणाले.

पुस्तकातील विधाने 
...मी भाजपत यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव ठेवला.उर्जा मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीच्या लग्नाला जाताना त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला मग निमंत्रणही दिले, त्यावेळी भाजपतील क्रमांक दोनचे मंत्रीमला भेटायला यायचे पण मी भाजपत गेल्यास त्यांची खाती जातील हे लक्षात आल्यावर त्यांनी भेटी बंद केल्या.
...मातोश्रीवर माझ्या विरोधात जे कट रचले जायचे त्यांची माहिती मला तेथील माझ्या माणसांमुळे मिळायची. 
...मनोहर जोशी यांचे पद माझ्यामुळे गेले,त्यामुळे नंतर मला मिळालेले विरोधी पक्षनेतेपद सुभाष देसाई यांना ते पद मिळावे यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
...सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याविषयीही आक्षेप.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com