राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश गुजरातच्या निकालापर्यंत लांबणार ?

narayan rane
narayan rane

मुंबई    :  नारायण राणे यांच्या समावेशानंतर शिवसेना नेमकी काय भूमिका घेईल याचा अंदाज नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार गुजरात निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्याचा प्रस्ताव भाजपत चर्चेत आला आहे.

निकाल अपेक्षेनुसार मदत करणारे असले तर मंत्रिमंडळविस्तार अत्यंत आत्मविश्‍वासपूर्वक केला जावू शकेल असे पक्षातील काही ज्येष्ठांना वाटते.

नारायण राणे यांना शपथ देतानाच राज्यातील काही महत्वाच्या मंत्र्यांना अकार्यक्षमतेबददल अर्धचंद्र देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.सरकारला पुन्हा विजयी करण्यासाठी उपयोगी ठरु शकतील अशा चेहऱ्यांना संधी देण्यात येईल.

मंत्री मंडळातून ज्या मंत्र्यांना नारळ द्यावयाचा आहे त्यांच्या नावांना  अद्याप  दिल्ली आणि नागपूर येथून अद्याप हिरवा कंदील मिळवायचा आहे . 

सामाजिक  न्याय, पाणी पुरवठा  आणि समाज कल्याण या मंत्रालयाचा कारभार अपेक्षेनुसार नसल्याचे सूत्रांनी सांगितले  

डिसेंबरच्या अधिवेशनात मंत्रिमंडळात बदल करणे धाडसाचे ठरणारे असल्याने ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचा 25 डिसेंबरचा मुहुर्त साधावा असा प्रस्ताव एका ज्येष्ठ नेत्याने ठेवला आहे.

नारायण राणे यांच्यासाठी  स्वतंत्र  शपथ विधी सोहळा घेऊन त्यांचा एकट्याचा मंत्रिमंडळात समावेश करावा . भाजपच्या फेरबदलांच्या घोळात राणेंना किती ताटकळत ठेवणार असे राणे समर्थक बोलू लागले आहेत . 

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी भाजपने तारीख पे तारीख असे धोरण स्वीकारलेले दिसते . आता किमान  ही तारीख तरी खरी निघाली तर राणे समर्थकांना दिलासा मिळणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com