narayan rane on tanaji sawant | Sarkarnama

सावंतांनी मंत्रीपदासाठी मोठी दक्षिणा उद्धव ठाकरेंना दिली होती!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सावंतांनी दक्षिणा दिलेला योग्य भटजी कोण, असा प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, आताचे मुख्यमंत्री.

मुंबई: माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मोठी दक्षिणा गेल्यावेळी उद्धव ठाकरेंना दिली होती, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

पत्रकार परिषदेत राणे यांना तानाजी सावंत यांच्या नाराजीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राणे म्हणाले, शिवसेनेचे जे 54 आमदार आले आहेत, त्यात तानाजी सावंत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेचे मोठे उत्सव, कार्यक्रम करण्यात त्यांनी योगदान दिले आहे. गेल्यावेळी मंत्री होत असताना त्यांनी मोठी दक्षिणा योग्य भटजीला दिली होती, मात्र आता त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यांच्या नावात तानाजी असल्याने ते अन्याय सहन करणार नाहीत, असे माझे मत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख