मंत्रीपदाच्या प्रतिक्षेला नारायण राणे कंटाळले? म्हणतात 'दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही'

मला मंत्रीपद कधी मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही. यामुळे मंत्रीमंडळात मी लवकरच दिसेन असे सांगतानाच आगामी निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आज येथे जाहीर केले.
मंत्रीपदाच्या प्रतिक्षेला नारायण राणे कंटाळले? म्हणतात 'दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही'

कुडाळ : मला मंत्रीपद कधी मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही. यामुळे मंत्रीमंडळात मी लवकरच दिसेन असे सांगतानाच आगामी निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आज येथे जाहीर केले.

राणे यांची आज येथे पत्रकार परिषद झाली. कोरेगाव भीमा मध्ये जे घडतय त्यावर कोणीही नेत्याने भाष्य करू नये, त्यामुळेच  हा वाद थंड होईल, असेही ते म्हणाले.आपल्या पक्षाबद्दल सांगताना ते  म्हणाले, ''स्वाभिमान पक्ष सभासद नोंदणी 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल. राज्यात पक्ष संघटना वाढवत असताना जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा जागा व खासदार विजयी करणे हे पक्षाचे प्रमुख लक्ष्य असेल. पडवे येथील हॉस्पिटल लवकरच सुरू करणार आहे. हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली आहे.'' यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, नगराध्यक्ष विनायक राणे, विकास कुडाळकर उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, ''सिंधुदुर्ग जिल्हा विकासाबाबत गेल्या तीन वर्षात दहा वर्षे मागे गेल्याची स्थिती आहे. सत्ताधार्‍यांचा जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी नाही. रस्ते खड्डेमय झाले आहेत. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. महसूल विभाग जनतेचे शोषण करत आहे. भ्रष्टाचार फोफावला आहे. अधिकारी बेजबाबदार पणे वागत आहेत. विमानतळाचे काम संथगतीने सुरू आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. आडाळी एमआयडीसी काम सुरू झालेले नाही. जिल्हा नियोजन कामाला कट बसला आहे. या सार्‍याला घोषणाबाज पालकमंत्री जबाबदार आहेत."

ते पुढे म्हणाले, ''अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत हे दुर्दैव आहे. तीन वर्षात शून्य काम असणारे निष्क्रिय पालकमंत्री, असे त्यांचे वर्णन करावे लागेल. जिल्हा नियोजनाच्या निधीला सरकारने 40 टक्के लावला कट लावला आहे. पालकमंत्री फक्त घोषणा करताहेत. निधी आणण्याची पालकमंत्र्यांची हिंम्मत नाही. पालकमंत्र्याचे तीन वर्षातील काम शून्य आहे.''

ग्रीन रिफायनरीला राणेंचा विरोध
कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध आपला विरोध असल्याचे राणेंनी स्पष्ट केले. कोकणच्या पर्यावरणाला धोका होत असेल तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com