येवून येवून येणार कोण ! राणेंसोबत जाणार कोण ? 

येवून येवून येणार कोण ! राणेंसोबत जाणार कोण ? 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या पक्षाची घोषणा आज मुंबईत झाली. " महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष" नावाच्या राजकीय पक्षाची घोषणा राणे यांनी केली. पक्षाची अविचल बांधिलकी भारतीय राज्यघटनेशी राहिल, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे, कामगारांचे, नोकरदार, महिला, दुर्बल घचक अल्पसंख्य समाजाचे प्रश्न हातात घेत माझा पक्ष वाटचाल करेल अशी घोषणा राणे यांनी केली. अन्‌ एकच चर्चा सुरू झाली, येवून येवून येणार कोण ! राणेंसोबत जाणार कोण ? 

आज नारायण राणे यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार शाम सावंत असे केवळ दोनच शिलेदार उपस्थीत होते. म्हणजे राज्यातील कोणताही विद्यमान आमदार त्यांच्याबरोबर नव्हता. नारायण राणे यांचा स्वाताचा मुलगा नितेश राणेही यावेळी उपस्थीत नव्हते. म्हणजेच राणे यांनी पक्षाची घोषणा तर केली खरी मात्र यामुळे राज्याच्या राजकारणात कसलीही उलथापालथ होण्यासारखी स्थिती नाही. 

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश अशा प्रांतातून राणेंसोबत आजघडीला कोणताच नेता नाही. राणे यांच्या कोकणातूनही त्यांच्या सिंधूदुर्ग वगळता बाकीच्या जिल्ह्यातूनही कोणताच दिग्गज आज त्यांच्याबरोबर नव्हता. 

राणे पहिल्यांदा बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले तेंव्हा राणेंसोबत 13 आमदार होते. आज मात्र माजी आमदार श्‍याम सावंत वगळता कोकणातील एकही मोठा नेता त्यांच्यासोबत नव्हता. आजच्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. 

राणे यांच्यासोबत आज कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर हे जातील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षांतरामुळे या दोघांचीही आमदारकी संपुष्टात येईल. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत या दोघांना निवडून येणे शक्‍य नसल्यानेच दोघांचाही पक्षप्रवेश लांबणीवर टाकला असल्याचे दिसत आहे. 

आजच्या पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेलाच धारेवर धरले. ते म्हणले, शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळ बैठकीत गप्प बसतात. अन्‌ बाहेर येवून बेलतात. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात भांडणाशिवाय काय केले ? महागाई कमी करण्यासाठी काही सुचना केल्या आहेत का ? लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करता मग सत्तेत कशाला गेलात ? महागाई राज्य आणि केंद्राने केली तर तुम्ही महापालिकेत काय केलं ? तुम्ही महापालिकेतील टॅक्‍स का कमी केले नाहीत ? 

बुलेट ट्रेनला विरोध नाही 
आयत्या बिळावर नागोबा म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका करताना बुलेट ट्रेन बद्दल मी काहीच म्हणणार नाही, कारण विकासाला माझा विरोध नाही, असे सांगत मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या रेल्वे प्रश्नावर राणें यांनी सरकारची बाजू लावून धरली. राणेंच्या नव्या पक्षात आता येवून येवून येणार कोण ! राणेंसोबत जाणार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com