महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणारः राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणारः राणे

कणकवली (सिंधुदुर्ग): आपण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत, तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहोत, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेचे स्वागत नारायण राणे यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंबईत कार्यक्रम घेवून भाजपप्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास आहे, असे नमूद करून शिवसेनेच्या विरोधाचा संबंध नसल्याचा दावा राणे यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com