नारायण राणे देणार भाजपच्या खासदारकीचा राजीनामा?

महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे संस्थापक व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबतची घोषणा ते लवकरच करतील, अशी चर्चा आहे.
नारायण राणे देणार भाजपच्या खासदारकीचा राजीनामा?

मुंबई : महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे संस्थापक व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबतची घोषणा ते लवकरच करतील, अशी चर्चा आहे. 

भाजप शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर राणे भाजपपासून काहीसे दूर झाले होते. राणे यांना मुख्यमंत्र्यांनी 'साईड ट्रॅक' केल्याची भावना राणे यांच्या गोटात झाली आहे. राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनालाही राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. राणे यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांना भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये स्थान देण्यात आले होते. पण त्याने राणे यांचे समाधान झालेले नाही. 

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती केली. आता दोन्ही पक्ष वेगळे लढण्याचे संकेत देत असल्या तरी सध्यातरी दोघांनाही एकमेकांना दुखवायचे नाही. त्यामुळे भाजप राणे यांना हाताच्या अंतरावर ठेवत असल्याचे बोलले जाते. राणे आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्या माध्यमातून लढवणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. राणे यांचा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच संदर्भात काल (रविवारी) स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राणे यांची भेट घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com