शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात `अवजड` संधी?

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचे नाट्य किंवा राष्ट्रपती राजवटीची औपचारिकता संपृष्टात आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी चिघळणार आहे. त्याचा फायदा नारायण राणे यांना होऊ शकतो.
शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात `अवजड` संधी?

पुणे - राज्यात मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आल्यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतुन देखील शिवसेनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेत केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या अवजड उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर या जागेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, अशी चर्चा सुरु असतानाच शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपकडून खासदार नारायण राणे यांनी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील समसमान सत्तावाटपाबाबत भाजपा खोटे बोलत असल्याचे सांगत, खोटे बोलणाऱ्यांशी यापुढे राहणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेत भाजपाबरोबर घरोबा करण्यास नकार दिला. यानंतर केंद्रातील सत्तेतुन देखील शिवसेना बाहेर पडणार का, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात होती. तर सोमवारी (ता.११) सकाळी केंद्रिय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी ‘‘शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असे ट्वीट करुन राजीनामा देत असल्याचे जाहिर केले.

यानंतर आता या पदावर राज्यातुन कोणाला संधी मिळणार, अशी चर्चा सुरु झाली असतानाच, भाजापाच्या कोट्यातुन खासदार झालेले नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपा शिवसेनेला डिवचण्यासाठी राणेंना केंद्रीय मंत्री करण्याची दाट शक्यता आहे. राणे यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर शिवसेना चिडली होती. तसेच नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिला होता. आता शिवसेनेला आणखी डिवचण्यासाठी राणेंचे कार्ड पुढे केले तर आश्चर्य नको, अशी शक्यता आहे.

अवजड खात आमच्या गळ्यात बांधल
शिवसेनेचे पक्षप्रमुख केंद्रातील मिळालेल्या खात्यावर देखील नाराज होते. त्यांनी ही नाराजी पत्रकार परिषदेमध्ये देखील व्यक्त केली होती. आम्हाला केंद्रात चांगले खात अपेक्षित होत. मात्र आमच्या गळ्यात अवजड खात बांधल गेलं, असे ठाकरे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com