नार्वेकरांची बंडखोरी हा नारायण राणेंचा डाव! 

हे शहर आधुनिकीकरणाकडे घेऊन जात असतानाच येत्या 4 जानेवारीपासुन वायफाय सेवा संपुर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
narayan rane has instigated narvekar.
narayan rane has instigated narvekar.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): महाविकास आघाडीतून बाहेर पडत कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या दिलीप नार्वेकरांची उमेदवारी हा नारायण राणे यांचा डाव असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.

येथील श्रीधर अर्पाटमेंट या आपल्या निवासस्थानी माजी पालकमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जावेद शेख, राजन पोकळे, शैलेश गवंडळकर, मयु पटेकर, राहुल नाईक, नंदु शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, "नगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण हे खुले प्रवर्गात असल्याने याठिकाणी बाबू कुडतरकर यांना संधी देण्यात आली आहे. ज्यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी हे आरक्षण पडेल. त्यामुळे त्यांना नक्कीच संधी देण्यात येईल. त्यामुळे याठिकाणी पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा असून शिवसेना सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.''

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नारायण राणे जिल्हा नियोजनमधुन सावंतवाडी शहराला तीन कोटी रुपये देऊ शकले तर मी पालकमंत्री असताना या शहरासाठी 28 कोटी रुपये दिले. हा माझा आणि राणे यांच्यामधील फरक असून राणे यांना या शहरात येण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केसरकर यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com