मुंबईतील कोकणवासियांच्या मदतीसाठी राणे यांच्याकडून विशेष कक्ष

राणे यांच्यावतीने सूपर्ण मुंबई व उपनगरासह ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात कार्यकर्त्यांचे या कामासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांकडे विभागनिहाय जबादारी देण्यात आली आहे. संपर्कासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक कोकणवासियांच्या विविध व्हॉटसॲप ग्रुपमध्ये पाठविण्यात आले आहेत
Narayan Rane Giving Special Attention towards Konkan Residents in Lock Down Period
Narayan Rane Giving Special Attention towards Konkan Residents in Lock Down Period

पुणे : लॉकडाऊनचा काळ आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या काळात कुणीही घराबाहेर पडू नका. या काळात मुंबईतील कोकणवासियांना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असेल तर कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आपल्याला हवी ती मदत घरपोच मिळेल, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील कोकणवासियांना केले आहे.

राणे यांच्यावतीने सूपर्ण मुंबई व उपनगरासह ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात कार्यकर्त्यांचे या कामासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांकडे विभागनिहाय जबादारी देण्यात आली आहे. संपर्कासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक कोकणवासियांच्या विविध व्हॉटसॲप ग्रुपमध्ये पाठविण्यात आले आहेत. या काळात औषधे, किराणा सामान यासह कोणत्याही प्रकारची मदत लागली तर त्यासाठी नागरीकांनी त्या-त्या विभागातील संबंधित कार्यकर्त्याला संपर्क केला तर घरबसल्या हवी ती मदत मिळण्यास मदत होईल, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. या शिवाय भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मोठी यंत्रणा काम करीत आहे. पक्षाचे कार्यकर्ते जबाबदारीनुसार विभाग निहाय काम करीत आहेत, असे राणे यांनी सांगितले.

मुंबईत सर्वाधिक कोकणवासिय राहतात. मुंबईच भागात कोकणातील लोकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या्र अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे आपले कर्तव्य आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरीत राहून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. मुंबईतील कोकणवासियांकडे राणे यांचे कायमच विशेष लक्ष राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com