शिवसेनेमुळे मुंडेही राणेंना भाजपत घेऊ शकले नव्हते, मग देवेंद्र कसे घेतील ? 

शिवसेना सोडल्यानंतरप्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे नारायण राणेंना एके दिवशी म्हणाले होते,"" राणेजी, आम्हाला काही तुम्ही परके वाटत नाही. तुम्ही आमच्याकडे यावं, अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. आमची शिवसेनेशी युती असल्यामुळे तुम्हाला थेट निमंत्रण देता येत नाही. आम्हाला शिवसेनेला नाराज करायचं नाहीय.'' आजही तशीच परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस तरी शिवसेनेला दुखवून राणेंना भाजप प्रवेश कसा देतील, नाथाभाऊ !
narayan rane bjp shivsena politics
narayan rane bjp shivsena politics

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाशी शिवसेनेचा काय सबंध असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. वास्तविक खडसे यांचे म्हणणे अगदी योग्य असले तरी आघाडीच्या राजकारणात शेवटी मित्रपक्षांना दुखवूनही चालत नाही हे ही लक्षात घेतले पाहिजे. 

राणे यांचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच ते पक्षातून बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांच्याशी न जमल्याचेही एक कारण सांगितले जाते. राणे हे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र शिवसेनेला विश्वास घेतल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पक्षात घेऊ शकत नाही अशी चर्चा आहे. 

नाथाभाऊ हे गेल्या चाळीस वर्षापासून भाजपत आहे. त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या सारख्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून कामही केले आहे. बदलत्या राजकारणात ते बॅकफूटवर गेले आहेत.

जर ते सत्तेत असते किंवा अगदी मुख्यमंत्री जरी असते तरी ते राणेंना आजच्या परिस्थितीत पक्षात घेऊ शकले नसते. राणेंना भाजपमध्ये येण्यात शिवसेनेचा काय संबंध हे बोलणे सोपे आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचणही लक्षात घेणेही गरजेचे आहे. 

यापूर्वी राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपनेही ऑफर दिली होती. याच्या आठवणीही खुद्द राणे यांनी त्यांच्या "झंझावात' पुस्तकात कथन केल्या आहेत. त्यापैकी गोपीनाथ मुंडेंना त्यांना भाजपत का घेता आले नाही ? हे सांगितले आहे. 

"झंझावात' मधील पान 85 वर राणेंनी म्हटले आहे, की मी शिवसेना सोडल्यानंतर सर्व पक्षांकडून मला निमंत्रण आलं होतं. भाजपने देखील मला त्यांच्या पक्षात येण्याचा आग्रह केला होता.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे मला एके दिवशी म्हणाले होते,"" राणेजी, आम्हाला काही तुम्ही परके वाटत नाही. तुम्ही आमच्याकडे यावं, अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. आमची शिवसेनेशी युती असल्यामुळे तुम्हाला थेट निमंत्रण देता येत नाही. आम्हाला शिवसेनेला नाराज करायचं नाहीय.'' 

त्यावेळीही राणेंचा शिवसेनेमुळे भाजप प्रवेश होऊ शकला नव्हता. आजही शिवसेना-भाजपची युती आहे. लोकसभेलाही ते पुन्हा एकत्र आले. केंद्रात, राज्यात सत्तेत आहेत. मग, देवेंद्र फडणवीस हे शिवसेना दुखवून नारायण राणेंना भाजपमध्ये कशी घेतील? याचा विचारही खडसेंनी करायला हवा.

शिवसेनेला दुखवून भाजप राणेंना प्रवेश देणार नाही. जी अडचण गोपीनाथ मुंडेंची होती तीच आज देवेंद्र फडणवीस यांचीही आहे हे समजून घेण्याची गरज आहे. 

जर शिवसेना-भाजप युती तुटली. वेगळे लढले तरच नारायण राणे भाजपत येऊ शकतात अन्यथा नाही असे वाटते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com