Narayan Rane on BJP entry drama | Sarkarnama

नारायण राणेंच्या घरी टॅक्सीने जाणारे ते मंत्री पुन्हा का आले नाहीत ? 

तुषार रूपनवर
बुधवार, 8 मे 2019

मुख्यमंत्र्यानंतरचे दुसऱ्या  क्रमांकाचे राज्याच्या कँबिनेट मधील एक नेते माझ्या घरी पाच ते सहा वेळा उबेरने आले होते. त्यांनी  माझी अनेकदा भेट घेतली.ते मला वर्षा बंगला किंवा अहमदाबाद वरून आलेला निरोप देतं.

मुंबई : नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस सोडून भाजप बरोबर जाण्याचा निर्णय कसा झाला याचा तपशील देताना अनेक गौप्यस्फोट केले आहेत . नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांच्या बंगल्यावर उबेर टॅक्सी करून गुपचूप अनेकदा भेटीस येणारे एक वरिष्ठ मंत्री एकदम का दुरावले याबाबतही या आत्मचरित्रात उल्लेख आहे . 

मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण नागपूरला दिलं होतं. तेंव्हा नारायण राणे यांनी  मुख्यमंत्र्यांच्या पीए ला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या विमानात तिकिट बुक केलं.फडणवीस आणि राणे यांनी विमानातून एकत्र प्रवास केला . तेंव्हा  देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीला विमानातचं नारायण राणेंना भाजपा प्रवेशाची आँफर दिली आणि विचार करा असं सांगितलं होते असे आपल्या आत्मचरित्रात राणेंनी नमूद केले असल्याचे समजते . 

भाजप प्रवेशाविषयी झालेल्या घडामोडींविषयी लिहिताना नारायण राणे म्हणतात ,"त्यानंतर काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना  वर्षा बंगल्यावर बोलवल. दोघात चर्चा झाली.त्यानंतर मुख्यमंत्री मला म्हणाले, तुम्हांला राज्याच्या कँबिनेट मध्ये किंवा दिल्लीच्या कँबिनेट मध्ये हवं ते पद देऊ.नंतर काही दिवस सीएम संपर्कात होते.  त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली. मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची शिवसेनेनं धमकी दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजपा नेतृत्व अस्वस्थ झालं आणि माझा पक्ष प्रवेश रखडला. 

तर दुसरीकडे मुख्यमंत्री  म्हणाले होते की, नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. काही दिवसांनी मला मुख्यमंत्र्यांनी अहमदाबादला अमित शहा यांच्या भेटीसाठी नेलं होतं. मुख्यमंत्र्यानंतरचे दुसऱ्या  क्रमांकाचे राज्याच्या कँबिनेट मधील एक नेते माझ्या घरी पाच ते सहा वेळा उबेरने आले होते. त्यांनी  माझी अनेकदा भेट घेतली.ते मला वर्षा बंगला किंवा अहमदाबाद वरून आलेला निरोप देतं. मात्र हेंच नेते नंतर माझ्याशी बोलणे  टाळू लागले. माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले. त्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं माझा प्रवेश झाल्यास त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यानंतर या मंत्री महोदयांनी आपल्या  फेऱ्या बंद केल्या. "

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख