narayan rane birthday 10 april | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नारायण राणे - माजी मुख्यमंत्री 

सरकारनामा
बुधवार, 10 एप्रिल 2019

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राजकीय जडणघडण खऱ्या अर्थाने शिवसेनेत झाली. मुंबई महापालिकेचे नगरसेवक,

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राजकीय जडणघडण खऱ्या अर्थाने शिवसेनेत झाली. मुंबई महापालिकेचे नगरसेवक,
बेस्टचे अध्यक्ष, आमदार, मुख्यमंत्री आणि आता राज्यसभा खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. आज ते स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. एक सामान्य कार्यकर्ता आपल्या कर्तृत्वावर मोठा झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजकारणात विशेषत: शिवसेनेत संधी दिली. त्यामुळे त्यांचा प्रवास एक नगरसेवक ते मुख्यमंत्री बनू शकले. एक  फायरब्रॅंड नेते म्हणून त्यांच्याकड पाहिले जाते. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणातही ते सक्रिय आहेत. नारायण राणे हे  राज्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख