उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरील नागोबा, राणेंचा हल्लाबोल 

  उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरील नागोबा, राणेंचा हल्लाबोल 

पुणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नाघोबा आहेत. शिवसेना वाढीत त्यांचं योगदान काय ? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला आहे. 

कणकवलीतून पूत्र नीतेश राणे विजयी होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कणकवलीत युती झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी तेथे सभा घेऊन तुमच्यावर टीका केली. ज्या पक्षात राणे जातात त्या पक्षाची वाट लागते असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला होता. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की मी 39 वर्षे शिवसेनेत होतो. पक्ष वाढविण्यासाठी त्याग केला आहे. 

पक्षासाठी सर्वकाही केले. त्यांनी पक्षासाठी काय काम केले. कोणते योगदान दिले हे ही सांगा? आयत्या बिळावर नागोबा आहेत ते. मी ज्या पक्षात वाढलो तो पक्ष स्थापन करणारे हे नव्हते. माझ्याविषयी भाजपला सल्ला देणारे हे कोण ? ज्यांनी मोदी-शहांवर टीकास्त्र सोडले तेच आज सत्तेसाठी युती करतात. भाजपकडून फायदा उठविण्यासाठी युतीत सहभागी होतात. 

त्यांनी जर माझ्यावर टीका केली तर मी स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही. मी उत्तर देणारचं. मी शिवसेनेचं आणि त्यांच नाव घेण्याचं टाळतो असे सांगत राणे म्हणाले, की कणकवलीत नीतेश निश्‍चित विजयी होणार आहेत. त्याच्या विजयाचा मला आनंदच आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराजय झाल्यास त्याचा आनंद मी व्यक्त कशाला करू. मी माझ्या मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करणार असेही ते म्हणाले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com