narayan rane and cm | Sarkarnama

आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये - नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मी मध्यस्थी करत आहे, मराठा संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलकांनी आता तुटेपर्यंत ताणू नये असे असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले. 

मी समाजाच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, तसेच मराठा संघटनांच्या नेत्यांशी बोललो, येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल व या प्रश्‍नावर मार्ग निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आंदोलन थांबल्यास सरकार चर्चा करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने तणाव वाढला का प्रश्‍नावर ते म्हणाले, मी आता केवळ आरक्षण या विषयावरच बोलणार आहे. अन्य कुठल्याही प्रश्‍नावर आता चर्चा करू नये असे ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख