narayan rane | Sarkarnama

नारायण राणेंविषयी आता कॉंग्रेसमध्ये नाराजी

संदीप खांडगेपाटील: सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

मुंबई : कॉंग्रेसचेचे नेते नारायण राणे यांची कॉंग्रेसकडून मनधरणी होत असल्याचे एकीकडे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून नाराजीचा सूर आवळला जात आहे. 
दादर येथील टिळक भवनचाही कानोसा घेतला असता, राणेबाबात कॉंग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर आळविला जात आहे. 

मुंबई : कॉंग्रेसचेचे नेते नारायण राणे यांची कॉंग्रेसकडून मनधरणी होत असल्याचे एकीकडे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून नाराजीचा सूर आवळला जात आहे. 
दादर येथील टिळक भवनचाही कानोसा घेतला असता, राणेबाबात कॉंग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर आळविला जात आहे. 
ज्या शिवसेनेने राणेंना भरभरून दिले, त्या शिवसेनेचे राणे होऊ शकले नाही, ते कॉंग्रेसचे काय होणार अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर एका कॉंग्रेसच्या नेत्याने दिली आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयात राणेंबाबत कमालीची नाराजी पहावयास मिळाली. अर्थात या नाराजीला मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदरच्या घडामोडींची पार्श्‍वभूमी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी आपण कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काही कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली होती, त्यामध्ये राणेंचाही समावेश होता. 

राणेंना कॉंग्रेसमध्ये आल्यापासून कॉंग्रेसची पक्षशिस्त पाळता आली नसल्याचा आरोपही मुंबईतील कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही राणे परिवाराकडून होत असलेल्या टीकेविषयीदेखील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर आवळला जात आहे. आपले म्हणणे पक्षाच्या व्यासपीठावर न मांडता मिडीयाकडे मांडून राणे परिवार कॉंग्रेसची एकप्रकारे बदनामीच करत असल्याचा आरोपही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नीलेश राणे व नारायण राणेंचा पराभव झाल्यावर ज्यांना आपला कोकणातील पारंपरिक गडही राखता आला नाही, त्यांना इतरांच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयातील कार्यकर्त्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली. पराभूत झाल्यावरही कॉंग्रेसने त्यांना मुंबईतील बांद्रा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्या निवडणुकीतही राणे पराभूत झाले. त्यानंतर विधान परिषदेत पाठवून कॉंग्रेसने राणेंचे पुनर्वसन केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख