narayan rane | Sarkarnama

राणेंच्या भाजप प्रवेशाला तूर्त पूर्णविराम

महेश पांचाळ : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई : कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रदेशावरून गेले काही दिवस उठलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. मला भाजपमध्ये ऑफर आहे असे उघडपणे सांगणाऱ्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश पिंपरी चिंचवड येथील भाजप राज्य कार्यकारिणीत होईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु गेल्या दोन दिवसात राणे यांच्या प्रवेशाबाबत माध्यमातून चर्चा होत असली तरी राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा निराधार आहे असे गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. 

आज राणे हे मुंबईत होते. आपण कॉंग्रेसमध्ये काम करणार असून भाजपबाबत माझ्याबाबत येत असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसकडून देशपातळीवर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसमधील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना महाराष्ट्रात गुरुदास कामत, नारायण राणे यांच्यासारखे नेते भाजपमध्ये जाऊ नयेत यासाठी कॉंग्रेसमधील एक गट कार्यरत आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख