narayan rane | Sarkarnama

राणेंचे भाजपमध्ये जाण्याबाबत तळ्यात-मळ्यात

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण भाजपमध्ये जाणार की नाही, याबाबत अजून तळ्यात-मळ्यात अशीच भूमिका घेतली आहे. अहमदाबादमध्ये जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा इन्कार त्यांनी केला असला तरी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण भाजपमध्ये जाणार की नाही, याबाबत अजून तळ्यात-मळ्यात अशीच भूमिका घेतली आहे. अहमदाबादमध्ये जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा इन्कार त्यांनी केला असला तरी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. 
राणे हे काल अहमदाबादमध्ये होते. त्यावरून ते भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण शहा यांची भेट घेतली नसल्याचा राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भाजपकडून मला पक्षप्रवेशाची नेहमीच ऑफर असल्याचे सांगत त्यांनी मात्र त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. अहमदाबादमधील हॉटेल हयातमध्ये माझी खासगी बैठक होती, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री व राणे एकाच गाडीत असल्याची दृश्‍य वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत आहेत. ही दृश्‍ये चुकीची असल्याचा राणे यांचा दावा आहे. कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी आपली भेट झाली होती. त्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले. मात्र त्यांनी अद्याप कारवाई केली नसल्याचे राणेंनी सांगितले. कॉंग्रेसमधील कोणाबाबत आपली नाराजी आहे, या प्रश्नावर त्यांनी जाऊ द्या ना, कशाला नको ते विषय उकरून काढायचे, असा प्रत्युत्तर दिले. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे समर्थकांत मात्र राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळर्यंतच राणे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा, होणार असल्याचे सांगण्यात येते होते. मात्र राणे यांनी भाजपच्या ऑफरबद्दल अजून निर्णय घेतला नसल्याचे सांगत यातील संदिग्धता अद्याप कायम ठेवली आहे. पत्रकारितेतील मित्रांना ब्रेकिंग न्यूज मिळावी म्हणूनच आपण राजकीय हालचाली करत असतो, असा टोमणाही राणे यांनी पत्रकारांना मारला, 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख