तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : नारायण कुचे

तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : नारायण कुचे

बदनापूर : मागच्या निवडणुकीत आपण माझा चेहराही न बघता मला निवडून दिले होते. मात्र आता मी पाच वर्षांत केलेली विकासकामे बघून मला मतदान करा, तुमच्या विश्‍वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही असे आश्‍वास नबदनापूर विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांनी प्रचारा दरम्यान मतदारांना दिले. टाळ, मृदंग आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत कुचे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल्याने प्रचारात उत्साहाचे वातावरण होते. 

राजूर येथे राजुरेश्वराचे दर्शन घेऊन आमदार कुचे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली. त्यानंतर दोन दिवसांत काजळा, घोटन, रांजणगाव, बुटेगाव, सायगाव, डोंगरगाव, कुंभारी, देवपिंपळगाव, मांजरगाव, ढोकसाळ या गावांना भेटी देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता. तर आज रोषणगाव, नानेगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, पिरसावंगी आदी गावांना भेटी दिल्या. 

मतदारांना गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती देत पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन कुचे ठिकठिकाणी करत आहेत. आमदार कुचे म्हणाले, बदनापूर मतदार संघातील जनतेने मला प्रत्यक्ष न बघता माझ्यावर विश्वास टाकला होता. मात्र हा विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविण्यात यशस्वी झालो, त्याचे समाधान वाटते. मागील पाच वर्षांत आमदार म्हणून केलेली विकासकामे बघून मला मतदान करावे. 

आपल्या भागात रस्त्यांच्या माध्यमातून विकासाचे घट्ट जाळे विणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सामान्य व्यक्ती हाच केंद्रबिंदू मानून आपण सामाजिक व राजकीय जिवनात वाटचाल करीत आलो आहोत. आगामी कालखंडात पायाभूत विकासकामांसह रोजगाराची नवीन साधने उपल्बध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून टंचाई व सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचे आश्‍वासन कुचे यांनी मतदारांना दिले. 

रस्ते, वीज, सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, निराधार योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याची ग्वाही देतांनाच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रेरणा आहे, त्याची जपवणूक व्हावी, या उद्देशाने अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने बसवला हे माझे भाग्य समजतो अशा भावना देखील कुचे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com