नागपूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते देशमुख यांना हटवण्याची मागणी

सावनेरातील महात्मा फुले वॉर्ड येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृहाच्या अधीक्षकेच्या विनयभंगप्रकरणी जिल्हा परिषदेचे सत्तापक्ष नेते विजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय देशमुख यांना सत्तापक्षनेते पदावरून हटवा, असे पत्र पीडितेचे वडीलांनी यांनीजिल्हा परिषद अध्यक्ष व समाजकल्याण सभापतींना दिले.
नागपूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते देशमुख यांना हटवण्याची मागणी

नागपूर : सावनेरातील महात्मा फुले वॉर्ड येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृहाच्या अधीक्षकेच्या विनयभंगप्रकरणी जिल्हा परिषदेचे सत्तापक्ष नेते विजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय देशमुख यांना सत्तापक्षनेते पदावरून हटवा, असे पत्र पीडितेचे वडीलांनी यांनी
जिल्हा परिषद अध्यक्ष व समाजकल्याण सभापतींना दिले.

"सावनेर येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे सचिव विजय भाऊराव देशमुख हे माझ्या मुलीला त्रास द्यायचे. विनयभंग करून शिवीगाळ करायचे. पीडितेच्या तक्रारीनंतर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2 मे रोजीची घटना असताना अद्याप कार्यवाही झाली नाही. याउलट, आरोपी समाजात उजळ माथ्याने फिरत आहे. विजय देशमुख हे जिल्हा परिषदेचे सत्तापक्ष नेता आहे. त्यांना या पदावरून तत्काळ पायउतार करा,' अशी मागणी त्यांनी अध्यक्ष निशा सावरकर यांना पत्रात केली आहे.

2016-17 या काळात मुली गैरहजर असल्याने तक्रारदाराने गैरहजेरी लावली. त्यामुळे संस्थेच्या वाटेला आलेले 36 हजारांचे अनुदान परत गेले होते. तेव्हापासून संस्था सचिव विजय देशमुख व अधीक्षिका यांच्यात वाद सुरू होता. तसेच काही मुली ऑगस्ट महिन्यापासून गैरहजर होत्या. त्यांचीसुद्धा हजेरी लावण्यास सचिवांनी अधीक्षिकेवर दडपण टाकले होते. मुलींच्या
गैरहजरीचे रजिस्टर बळजबरीने व धमक्‍या देऊन भरायला लावणे, शिवीगाळ करणे, असे आरोप देशमुख यांच्यावर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com